"गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी " याप्रमाणे या वर्षाच्या सरतेशेवटी काही गोष्टी लक्षात ठेवण्या जोग्या नक्की असणार, तसे पहिले तर अनेक गोष्टींचे साक्षीदार म्हणुन हे २०१७ वर्ष राहिले आहे. या वर्षाने ही आपल्याला बरेच से सुख-दुःख, यश-अपयश दिले असणार, काही लोक सोडून गेले असणार , तर नवीन काही लोक जोडले ही गेले असणार. प्रत्येक वर्षाप्रमाणे हे वर्ष देखील आपले ३६५ दिवसांचा कालखंड पूर्ण करून आपल्या सर्वांचा निरोप घ्यायचा तयारीत आहे आणि अशा वेळेस आता आपण उठून एका नव्या उमेदीने अणि उत्साहाने २०१८ च्या स्वागताच्या तयारीला लागले पाहिजे.
या नव्या वर्षांसोबत आपण नवी ध्येये, नवी क्षितिजे गाठण्याची मोर्चेबांधणी करायला हवी. यश-अपयशाचा विचार न करता सकारात्मकते ने येणार्या प्रत्येक आव्हानाला आपण सामोरे गेले पाहिजे.
जगातील अनेक मोठ्या गोष्टींची सुरूवात ही छोट्या-छोट्या गोष्टीच्या प्रयत्नांमधून झाली आहे, त्यामुळे आपणही आपल्या जीवनात अनेक गोष्टींची सुरूवात ही लहान-लहान ध्येयांमधुन करायला हवी. या सर्व प्रयत्नांमध्ये जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम, योग्य मार्गदर्शन, सकारत्मक विचार व आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण नक्कीच आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकतो.
प्रसिद्ध व्याख्याते 'शिव खेरा' यांचे हे वाक्य कायम लक्षात राहण्याजोगे आहे. "जितने वाला कोई अलग काम नही करता, वो अपना काम अलग ढंग से करता है". तरी आपणा सर्वांना हे येणारे नवे वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा...!!
-प्रसाद भणगे, पुणे.
No comments:
Post a Comment