- "जीने मला लढायला आणि बोलायला शिकवलं त्या छात्रभारतीचा कार्यकर्ता असल्याचा मला सार्थ अभिमान आहे ." गेली ३५ वर्षे छात्रभारती गोर-गरीब ,कष्टकरी विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्रात काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर छात्रभारतीने लढा उभारला आहे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा पवित्रा अगदी आक्रमक पण संविधानाने दिलेल्या मार्गाने केलेला आहे. आजपर्यंत माझ्या सारख्या हजारों विद्यार्थ्याना जे काही संविधानिक बळ, स्थैर्य मिळाले ते फक्त आणि फक्त छात्रभारती मुळेच.
आज मी जो काही आहे, जे काही बोलतो ते फक्त छात्रभारतीमुळे. माझ्या विचाराची दिशा पक्की केली ती देखील छात्रभारतीने. आज कोणत्याही स्टेजवर आपला मुद्दा पटवून देतो तो छात्रभारतीच्या माध्यमातून होत असलेल्या अभ्यासमंडळांच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने मला विवेकशील माणूस बनविण्याचे काम केले ते छात्रभारतीने. छात्रभारतीने माझ्यावर इतके उपकार केले आहे की ते मी कधीच विसरू शकत नाही. नेतृत्व,वक्तृत्व आणि आपुलकी ही सारी कार्यपद्धती छात्रभारती कडून शिकलो, महाराष्ट्रभर असलेले कार्यकर्ते जेव्हा आपुलकीने आणि तेवढ्याच काळजीने,पोटतिडकीने आपली विचारपूस करतात तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं. आज छात्रभारतीच्या माध्यमातून मी कोणाचा भाऊ,कोणाचा मुलगा ,कोणाचा मित्र झालो आहे.
अनेक लोकांशी रक्ताचे नाही पण त्याहून अधिक महत्वाचे नाते निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नाही जिथे माझ्या ओळखीचा एक कार्यकर्ता नाही, छात्रभारतीने खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची संधी दिली. अनेक आंदोलने,मोर्च्यांमध्ये सहभागी झालो.अनेक गोष्टींविषयी माहिती मिळत गेली. खऱ्या अर्थाने माझ्यातला कार्यकर्ता जिवंत करण्याचं काम छात्रभारतीने केलं आहे.
खऱ्या अर्थाने समतावादी बनवण्याचं काम छात्रभारतीने केलंय.शिक्षण,सहभाग,समता या त्रिसूत्री नुसार छात्रभारतीचं काम चालतं. १८ डिसेंबर २०१७ रोजी छात्रभारतीला स्थापन होऊन ३५ वर्षे होत आहेत. शिक्षणासाठी छात्रभारतीचा संघर्ष अविरतपणे चालू आहे. आजपर्यंत छात्रभारतीचा भाग झालेल्या सर्व जिंदादील कार्यकर्त्यांना माझा सलाम....!
"छात्रभारती की खास बात....लढाई पढाई साथ साथ"
लढेंगे जितेंगे.
आपलाच साथी
रशीद मनियार .
(९६६५८५४३१५)
No comments:
Post a Comment