सोडून जाताना एकदा तरी सांगायचं होतस...
काही व्यक्ती अशा असतात की त्यांची साधी आठवण आली तरी स्तब्ध व्हायला होत.कधी त्या व्यक्तीच्या आठवणीत रमायला होत कळतही नाही.
अशाच प्रेमळ व्यक्ती आपल्याला त्यांचा लळा लावून जातात. काही वेळेस आठवणीत रमून गेल की नकळत डोळ्यातुन पाणी ही येत...कधी अश्रू व्हायला लागतात समजतच नाही.. जुने फोटो पाहावे तरी काळजात धस्स होत..कारण नुसते फोटो पाहिले तरी मन व्याकुळ होत...
अशी ती माझा आयुष्यात येऊन मला भावनिक व्हायला शिकवून गेली . दुसरं कोणी कितीही लांबच असो की जवळच आपण मात्र नेहमी हसत राहायला हवं ...असच ती नेहमी सांगत असायची. मी तसा तिच्या जवळचा होतोच ..आई सारखी माया द्यायला ती कधीच कमी पडली नाही..कधी रागवलीही नाही. ज्या ज्या वेळी मी समोर असेल त्या वेळी तिचा आनंदच वेगळा असायचा ..हो तो आनंद आजही जशाचा तसा माझा समोर उभा राहिलाय. तो माझ्याकडे पाहून आता हसतोय बहुतेक ....का तर आता तो तिच्या सोबत निघून गेलाय ना...म्हणून कदाचित तो खुश असावा...मला मात्र हसून हिनावतो आहे..
कधी कधी वाटत का गेली असेल ती मला सोडून ..?का तिचं प्रेम नव्हते का माझ्यावर ..?? ती गेली त्या दिवशी किंवा त्या आदी मी तिच्याशी कधी बोललो हे सुद्धा लक्षात
नव्हते...अस का झालं असावं..का ती जाणार होती म्हणून मला ती भेटली नव्हती...हो हे खरं असेल कदाचित कारण मी तिला जाऊच दिल नसतं ना....आमचं ठरलं होतं,की आयुष्यभर सोबत राहायचं...म्हातारी झाल्यावर माझाच आधार होता तिला....
किती स्वप्न अधुरे सोडून गेलीस ग तू ?? मला अधिकारी होताना पहायचं होत ना तुला..?? मी कसा साहेब म्हणून मिरवून घेईल हेही पहायचं होत ना ..?? न सांगता गेलीस याच दुःख आहेच ..! पण कधी कधी वाटत की गेलीस ते बर ही झालं ..कारण तू गेल्यानंतर तुझी किंमत मला तर माहीत होतीच पण ती बाकीच्या लोकांना ही समजली...तुला होणारा त्रास मला कधीच मान्य नव्हता.मात्र होणारा त्रास कधीच कमी करता आला नाही याचं दुःख कायम मनात राहिलं आहे.
ज्या दिवशी तुझा अपघात झाल्याची बातमी ऐकली त्या वेळी खरं तर रागच आला होता मला...का गेली होतीस रोडला?? तुला गाड्या बघून रस्ता ओलांडता येत नाही माहीत होत ना मग तरी सुद्धा गेलीस ...म्हणून याची शिक्षा तुला व्हायला हवी असच मला वाटलं...म्हणून मी ही निवांत राहीलो.. गादीवर आडवा पडून टीव्ही पाहण्यात मी रमलो होतो ..त्यावेळी का वाटलं नसेल की तुला अपघात झालाय त्यात तुला खरंच लागले असेल का?? कोणत्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेत याची साधी चौकशी सुध्दा केली नाही मी. जेवण करून झोपताना एक फोन केला तेवढा सोनीला, की कुठे घेवून गेलीस तिला म्हणून आहे का जिवंत अस फक्त नेहमी प्रमाणे रागात बोललो ..पण यावेळी तु जीवंत नाहीस अस सोनी बोलली ग...न मी हसून ही बोललो कि बरं झालं असच पाहिजे तिला...सर्वांची काळजी करते. पण स्वतःची काळजी घ्यायची म्हटले की नको वाटत तिला.....सोनी मात्र शांतपणे ऐकत होती ...माझं बोलणं संपण्याची वाटच बघत होती....माझं बोलणं संपते ना संपते तेच ती बोलली डॉक्टर बोललेत की सकाळी तुम्हांला डेड बॉडी मिळेल ..उद्याच अंत्यसंस्कार करावे लागतील ...अस सांगताच मी हसलो मात्र त्याच वेळी जोराचा हंबरडा सोनी नी फोडला अमोल खरंच रे आपली काकू आपल्याला सोडून गेली.
डॉक्टर बोलले, आणायला थोडा उशीर झाला नाही तर तुमचे पेशंट वाचले असते.. याला दोषी तूच होतीच असच वाटलं मला कारण तू दिवसभर शेतातून काम करून आली होतीस,दिवसभर उपाशी होतिस तुला घरात बसता येत नव्हत का ??.पण गरिबी पुढे आरामला कुठे जागा असते?? घरातील पीठ संपले होते म्हणून तू दळण आणायला गेली होतीस हे नंतर समजले... रात्रीही उपाशी झोपली असतीस तर बिघडले कुठे असते...?? असच मनाला कुठे तरी वाटत राहतं.. पण तुला सांगायचं राहवून गेलं की तू जाण्याला मीच जबाबदार आहे. तुला रिक्षाने धडक दिली याची पहिली बातमी मलाच समजली होती .मी मात्र तुलाच दोष देत बसलो....मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही..अजूनही तू दिलेला मायेच्या ठेवा मी जपून ठेवला आहे.
No comments:
Post a Comment