Wednesday, 3 January 2018

बदल हवा....बदल हवा...( ऋतुजा हगवणे )

      
      "आज मे  उपर, आसमा नीचे...... 
आज मे आगे ....जमाना हे पीछे..."  गाण्याच्या या ओळी गुणगुणत गीता खुपच खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आज फार तेज दिसत होते....  हॉस्टेल मधल्या पोरी तिच्याकडे पाहुन जरा आवाकच झाल्या होत्या. त्याला कारणही तसेच होत बरका... काही दिवसांपूर्वी आलेली गीता आणि आताच्या घडीला बदललेली गीता यात खूपच फरक होता. महिन्याभरापूर्वी गीता सोलापुरातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी आली होती. अभ्यासात हुशार असणारी गीता डोळ्यात अनेक स्वप्न साठवून पुण्यात आली होती . गीताकडून घरच्यांच्या अपेक्षाही भरपूर होत्या. कॉलेजच्या पाहिल्या दिवशी गीता साधीच गेली. पण तिथलं वातावरण पाहून थोडीशी थबकलीच. छान-छान जीन्स टॉप घातलेले पोर पोरी.. त्यांचं छानसं राहणीमान.. गीता मात्र फार साधी मुलगी होती. या सगळ्यांपुढे ती स्वतःला कमी समझू लागली. गीताच्या राहणीमानामध्ये थोडासा गावाकडील टच होता.  तिच्या राहणीमानावरून अनेकदा तिच्यावर कमेंट देखील केल्या गेल्या.  
         
या सगळ्यामुळे गीताचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर डगमगू लागला. ती खचू लागली. आणि कशाचाच विचार न करता तिने थेट सोलापूरच गाठले. घरचे जरा गोंधळातच पडले. घरच्यांनी कॉलेज  होस्टेलची संपूर्ण फी भरली होती. त्यामुळे त्यांचा जीव आणखीनच बुचकळ्यात पडला  पुण्यावरून जाऊन आल्यावर गीताच्या वागण्यात बराच बदल झाला होता . घरच्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गीताला मानसोपचार तज्ञाकडे नेले. आधी मानसोपचार तज्ञ यांनी गीताला बोलत केलं मग हळूहळू एक एक गोष्टी उलगडू लागल्या. यावर डॉक्टरांनी गीताला कमालीचे सल्ले दिले. जगाबरोबर आपणही बदललं पाहिजे , किती दिवस जुन्या गोष्टी घेऊन बसणार ...?        
     
    छान राहून ,छान दिसणं थोडी ना वाईट आहे... तू तुझ्या राहणीमानात बदल घडव तो पण तज्ञाचा सल्ला घेऊनच ...एक छानसा हेअरकट करुन बघ , राहा एकदम मस्त पण हे अती सुद्धा होणार नाही ना याची काळजी घेणंही आवश्यक आहे. आज परफेक्ट रहाणं ,नीटनेटकं राहणं जगाची गरज आहे. आणि जग सुद्धा याच गोष्टींकडे आकृष्ट होत असं म्हणणं पण वावगं ठरणार नाही. जसा गाव तसा वेष असावाच की
       मानसोपचार तज्ज्ञांच्या सांगण्यावरून गीताने स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने तीन आपलं रुपडंच पालटलं ... छानसा व्यवस्थित तिला शोभेल असा हेअरकट, नीटनेटका ड्रेस , चेहऱ्यावर या सगळ्यामुळं आलेलं कमालीचं तेज यामुळे गीताच्या चेहऱ्यावर आता कमालीचा आत्मविश्वास दिसत होता. आता ती कॉलेज मधल्या त्या मुलामुलींसमोर स्वतःला  कमी समझत नव्हती. हा बदल केल्यामुळे निर्माण झालेल्या  आत्मविश्वासामुळे गीताची सगळ्यांशी चांगली नाती जमली. आणि गीताचा आधी असणारा हसरा, खळखळणारा स्वभाव तिच्यात पुन्हा आला.
         या उदाहरणावरून सांगायचं हेच कि जर चांगलं , नीटनेटकं राहील तर कुठे धाड भरतेय? चांगलं राहणं हा तर गुन्हा नाहीना ? हि तर काळाची गरज आहे. आणि तीच गरज ओळखून प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल करणं अपेक्षितच आहे. जगाबरोबर चालायचं म्हंटल्यावर हे असं मेंगळटसारखं राहणीमान नाही म्हंटल तरी चार चौघात ओशाळवाणं वाटत. किती दिवस आपण घेऊन बसणार  जुने आजकाल कुठेही मुलाखतीसाठी जा तिथे तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंतचा नीटनेटकापणा पहिला जातो. मग का नाही दिसायचं छान ? का नाही राहायचं छान ? या सर्वांमधून जर चांगलंच साध्य होणार असेल तर आपण नक्कीच बदलले पाहिजे.


     स्वतःमधील म्हणजेच राहणीमानातील बदलही योग्य त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केला पाहिजे. नाहीतर करायला गेलो एक आणि झालं एक अशी नको व्हायला .... काहींना माझे हे म्हणणे पटेल किंवा पटणारही नाही . पण विचारा स्वतःच्या मनाला हा प्रश्न , काय चुकीचे आहे यात ?... नाहीना ? मग तर झालंना... बदल हवा जो आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल, जो आपल्याला आत्मविश्वास देईन .. बदल हवा जो आपल्या पंखांना बळ देईन. आपल्याला मनसोक्त गगनभरारी घेऊन देईल... म्हणूनच म्हणते बदल हवा.. बदल हवा ...... बदल हवा.... 

                                 
                                                                                                       -ऋतुजा दत्तात्रय हगवणे

No comments:

Post a Comment