Tuesday, 9 January 2018

६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राची समीक्षा प्रथम


      पुणे प्रतिनिधी:-स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन च्या वतीने राजीव गांधी स्टेडियम मध्ये आयोजित केल्या गेलेल्या स्टुडंट ऑलम्पिक नॅशनल चॅम्पियनशिप चा शुभारंभ झाला. यामध्ये देशभरातील विविध राज्यांमधील शाळा व महाविद्यालयातील विध्यर्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच सहभागी खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले.
        शुक्रवारी पहिल्या दिवशी एथलेटिक्स स्पर्धेच्या अंडर-१० या वयोगटातील ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या समीक्षा हिने १०.८७  सेकंदाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अंडर-१२ या वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरियाणाच्या प्रियाने प्रथम तर समीक्षा ने दुसरा क्रमांक पटकावला. या ऑलम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी देशभरातून तीन हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.रोहतक येथे दि. 4 ते 7-1-2018 या कालावधीत या स्पर्धा झाल्या. 

No comments:

Post a Comment