![]() |
सदरक्षणाय खलनिग्रहणाय.....की उलट अशी स्थिती होतेय आज? |
जेव्हा समाजाला असुरक्षितता वाटते तेव्हा ती असुरक्षितता दूर करण्याचे काम शासकीय नियमांनुसार प्रथमतः पोलिसांचे असते मग बाकीच्या यंत्रणा असतात. परंतु आता हे चित्र पूर्णपणेच बदलले दिसतेय. कारण आजच्या समाजाला ह्या लोकांच्या 'तडजोडीची' भीती ही अधिक वाटत असते. कारण जशी दरोडेखोराची जात असते तशीच काही ह्या तडजोड करण्याऱ्या लोकांची असते. जर का कोणाचा या जगात यासंबंधी 'वाली' नसेल तर मग त्या संबंधिताला किती मरण यातना सहन कराव्या लागत असतील ते देवच जाणे. कारण हे गणित सर्व पैस्यावर अवलंबून असते.मग फार तर फार पुढे हे गणित आजच्या भाषेत दूसरी तडजोडी म्हणजे शारीरिक असते. पण जास्त करुण पैसा हा मोठा ठरत असतो.
साधे उदाहरण घ्यायच म्हंटले की आपण वाहतूक पोलिसांचे घेऊयात. ह्या लोकांच जास्त लक्ष हे वाहतूक नियमनावर नसून ते दंडात्मक (म्हणजेच तडजोडीची) कारवाईवर जास्त असते. वाहतूक नियमनाचे मुळचे काम सोडून ही पोलीसं दररोज अनेक लोकांना या तडजोडीला सामोरे जाण्यास भाग पाडतात.
हे सर्व सांगण्याचा उद्देश् एकच होता की महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ही वर्दीतील मुघलाई चालू आहे.तुरुंगातील मंजूळा शेट्ये प्रकरण शांत होत नाही तो पर्यन्त हे सांगलीचे प्रकरण समोर आले. अनिकेत कोथळे ह्या मुलाच्या बाबतीत हेच घडले. पोलिसांच्या ह्या क्रूरपणामुळे गेल्या दोन महिन्यात ही दोन बळी गेलेत. कुठतरी वैयक्तिक हेव्यादाव्या पोटी त्याला अटक करुन लवकरात लवकर न्यायालयीन कामकाज ओळखीच्याच वकीलामार्फ़त उरकूण पोलिस कोठडी मिळऊन घेतली. कारण यामध्ये आरोपीस योग्य ती 'ट्रीटमेंट' देता येते. जेवढी रक्कम ( तडजोडीची ) बाहेरून मिळालेली असते , तेवढा राग मग यामध्ये काढला जातो. परंतु येथे तर कौर्याची परिसीमा झाली किरकोळ गुह्यांतील आरोपीला थर्ड डिग्री देतांना त्यांच्या जीवण-मरणाच्या विचार न करता त्याला बेदम मारण्यात आले आणि त्यात कोथळे चा मृत्यु झाला.पण येथे यांचे शौर्य(कौर्य) थांबले नाही.. ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह मोठ्या हिमतीने (उपस्थित पोलीसांशी संगतमत करूण) पोलीस स्टेशनच्या बाहेर नेऊन एका दुरच्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला.

येथे प्रश्न निर्माण होतो की हे सर्व धाडस निर्माण कस काय होत असेल.असे कोणते घटक असतात की माणसाला इतके क्रूर रानटी पशु सारखे वागायला वा कृती करायला भाग पाडत असतील. तर अनेक वर्ष ही लोक त्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेली असतात.यातून अनेक आर्थिक संबंध हे तयार झालेले असतात...त्यात वैयक्तिक लागेबांधे.......राजकीय पाठबल...स्वतःचा खोटा रुबाब...आपण म्हणजेच सर्वकाही ही वृत्ती...नव्या जगातील 'सिंघम' प्रतिमा..त्यात वर्दी...प्रतिमेचा दुरुपयोग....समांतर पोलीस ठाणे...असे अनेक कारणे यामध्ये आहेत.मग येथूनच कुठून तरी ह्या वृत्तीचा उगम होतो आणि मग पदाची ,स्वतःच्या अधिकारांची नैतिकता विसरून युवराज कामटे सारखे अधिकारी पुढे येतात आणि असले कौर्य करुण बसतात. ही खूप भयान आणि मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. या मध्ये नुसताच दोष काही समोर असलेल्या लोकांचा नाही आहे तर यांची सर्व कारनामे माहित असून त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा सुद्धा आहे. सध्या तर शिस्तप्रिय असे पोलीस अधिकारी उच्च स्तरावर तेथे आहेत. समाजात त्यांची नुसतीच भाषणे आनंदाने ऐकली जातात. ह्या अधिकाऱ्यांनी समाजाला मार्गदर्शन बंद करुन जर स्वतःच्या विभागापूर्ता जरी विचार करुन ह्या चांगल्या गोष्टींचा अंमल केला तरी खूप उपकार होतील. आज ह्या घटनेमुळे संपूर्ण पोलिस खात्याला जबाबदार नक्कीच धरता येणार नाही,परंतु काल मुंबई ,आज सांगली आणि अजून उद्या काही.....! मग हीच शृंखला चालू ठेवायची का ? हे गृह खात्यानेच ठरवावे.... कारण 'वर्दी'तील खरे रूप आता बाहेर येत आहे....
- अमित येवले.
BE (Electrical)
master's in Public Administration
No comments:
Post a Comment