एक १०चा कॉइन
आणि २ रुपये सुट्टे..
स्टेशन पर्यंत पोहचवतील येवढेच काय ते शिल्लक पैसे घेउन मी रागा रागात रिक्षा स्टॉपच्या दिशेने निघालो होतो.
मीटर चे ४७ रुपये झाल्यावर whatsapp मेसेजला रेप्लाय देतांना ५० ची नोट त्याच्या हातात टेकवल्यावर तो रिक्षावाला ३ रूपये चेंज द्यायचा तेव्हा
' रैहने दो भैया" असे ज्या ज्या वेळेस बोलो होतो ती प्रत्येक 'माजोडी ' आठवण अजून डोळ्या समोरून जातच नव्हती...
रिक्षेतून उतरल्यावर सिंग्नल क्रॉस करतांना मला पूर्वी कधीच न दिसलेले ते खादाड लोकं आणि ते खाऊचे स्टॉल जमिनीतून प्रकट झाल्यासारखे आज अचानक माझ्या समोर उभे राहिले होते.
समोर येणारा प्रत्येक चेहरा श्रीमंत दिसत होता खिसे भरलेल्या गर्दी सोबत मी आठ मिनिटे चालून कसा तरी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहचलो.
जपून पावले टाकत टाकत दुर पर्यंत माझी नजर TC कुठे दिसतोय का ते शोधत होती. without ticket जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लकच नव्हता.चिड-चिड ,संताप आणि डोक्याचा नुसता भुगा होत होता...
CST ट्रेन मध्ये बसलो सीटवर बसल्या बसल्या आधीची गाडी ही नव्हती हे माहीत असतांना सुध्दा आजूबाजूला काही 'काळ्या' रंगाच दिसतय का..??
माझ्या केविलवाण्या हालचाली बघून,काहीच माहित नसतांना सुद्धा समोर बसलेला पंचेचाळीसीतला काका खाली वाकून माझ काही हरवलंय म्हणून तो पण शोधू लागला..
आता त्याला कोण सांगणार काही तासांपूर्वी CST वरुन येतांनाच "माझं काळ्या रंगाच पाकीट हरवलं होत..."
घोळक्यात किंवा एकटे मिरतांना,छोटी वा मोठी चड्डी किंवा नागडे असतांना सुद्धा ढुंगनाला हात लावताच ज्याचा आधार वाटायचा ते पाकीट 'आधार कार्डा' सोबत मला कायम साठी सोडून गेले होते....
फोन दोनदा vaibrate झाला.. "आता माझ्या जवळ फक्त ५०० आहेत" माझे पाकीट हरवले हे समजल्यावर मला बळजबरी पैसे घेण्यासाठी बोलवलेल्या त्या जिवलग मैत्रीणीचा मेसेज वाचून रिप्लाय न करताच फोन लॉक केला..
घाटकोपर गेल्यानंतर मागच्या बाजूला गाण्याचा आवाज येत होता.ते नेहमीचेच पैसे मांगणारे भिकारी म्हणून दुर्लक्ष करण्यासाठी मी माझ्या डोक्यात धावणाऱ्या विचारांसोबत खिडकीच्या बाहेर बघत होतो.दोन्ही पाय नसलेली एक लहान मुलगी सरकत सरकत केव्हाच माझ्या पाया जवळ आली होती.
दरवाज्या जवळ असलेल्या, बोगीतल्या दांड्या जवळ उभी राहून तान्ह बाळ हातात घेउन तिची मोठी बहीण एका फळीवर ठेकाधरुन साईबाबाचे गाणे बेसुरात गात होती, त्या समोरच्या काकांनी माझ्या पाया जवळ आलेल्या त्या चिमुरडीच्या हातात पाच रुपये ठेवले. माझ्या दिशेने वळत एका हाताने, माझा पाय हलवत दुसरा हात तिने पुढे केला.. माझ्या कडे नेमकी बोलायला आणि द्याला काहीच नव्हते.
दरवाज्या जवळ असलेल्या, बोगीतल्या दांड्या जवळ उभी राहून तान्ह बाळ हातात घेउन तिची मोठी बहीण एका फळीवर ठेकाधरुन साईबाबाचे गाणे बेसुरात गात होती, त्या समोरच्या काकांनी माझ्या पाया जवळ आलेल्या त्या चिमुरडीच्या हातात पाच रुपये ठेवले. माझ्या दिशेने वळत एका हाताने, माझा पाय हलवत दुसरा हात तिने पुढे केला.. माझ्या कडे नेमकी बोलायला आणि द्याला काहीच नव्हते.
मी फक्त तिच्या डोळ्यांत बघत आतल्या आत फुटफुटलो...
"आज खरचं काहीच नाही देण्यासाठी...."
दोन सेकंद तशीच माझ्याकडे बघत नंतर पुढे पुढे सरकत ती दिसेनाशी झाली....
मोबाईल पुन्हा vaibrate झाला...
" मला १०-१५ मिनिटे उशीर होणार..
मीटिंग मध्ये आहे...सॉरी"
कोणतेही बाहुले add न करता मी तीला रिप्लाय केला.
"...ओके..."
डोक्यातली चिड चिड.... माझ्या कडे विनाकारण बघणारा समोर बसलेला काका आणि हात पुढे करुन "डोळ्यांनीच" पैसे मागणारी ती मुलगी, पुढे जाणाऱ्या ट्रेन पेक्षा वेगाने डोक्यात विचार धावत होते, खिडकीच्या बाहेर झप झप जाणाऱ्या आकृत्यां कडे बघत, मी डोक्यात उडालेल्या गोंधळाला वाट दाखवण्याचा निष्फल प्रयत्न करत होतो...
CST येइपर्यंत केव्हाच पाऊस सुरु झाला होता...
मी without ticket सुखरूप स्टेशन च्या बाहेर पडलो. आमच्या नेहमीच्याच जागेवर भींतीचा आडोसा घेऊन पावसाचा आवाज ऐकत मैत्रिणीची वाट बघत उभा होतो.रस्त्याच्या कडेला ताडपत्रीने बांधलेले घर पावसापासून वाचवण्यासाठी दोघे माय लेकं आरडाओरडा करून दोरी बांधत होते..
२-३ मुलं सिगारेट फुकत उभे होते.एक जोडप ओठाला ओठ लावण्याच्या बेतात बिलगद होत. कुडकुडनारा एक कुत्रा बसण्याची जागा शोधण्यासाठी तिथेच गोल गोल घुटमळत होता.
खिशात पैसे नसतांना फ्री मध्ये ऐकायला मिळणारा पावसाचा आवाज,मी हाफाफल्या सारखा डोळे बंद करून कानात जीरवत होतो..
छत्री बंद करण्याच्या आवाजा सोबतच तिने मागून मला डोक्यावर टपली मारली..
"मूर्ख आहेस तु पाकीट कसं हरवलस..? हे घे आधी.."
अस बोलून माझ्या हातात ५०० चि नोट आणि ATM card कोंबले.
मी काही बोलण्याच्या आत माझा हात पकडून ती मला पुढे घेउन जात होती...
"हे office वाले पण ना साले...किती वेळ केला ...आज पप्पाचा बर्थडे आहे....माहित होत तरी पण ना.."
एकाच दमात ती सर्वच सांगण्याचा प्रयत्न करत होती.
धावत धावत आम्ही प्लॅटफॉर्म १ वर पोहचलो .
शेवटचाच लेडीज ड्ब्बा पकडून ती आत शिरली.
लगेचच मोठा भोंग्याचा आवाज करुन तीची ट्रेन निघाली..
इशाऱ्यानेच कॉल करते असे सांगुन ती bye bye करत होती...
धावल्या मुळे फुललेला श्वास..विनाकारण चेहऱ्यावर आलेले हसू, "पिन कोड" माहीत नसलेले ATM कार्ड आणि ५०० रुपये हातात तसेच पकडून मी मागे वळलो...
तोच समोर उभा असलेल्या काळ्या पांढऱ्या ड्रेस मधल्या TC ने एक हात पुढे करत माझ्या दोन्ही डोळ्यात बघत विचारले..
तिकिट...??
- सुमित ढिवरे.
(लेखक हे एल एस रहेजा चे माजी विध्यार्थी असून सध्या मुंबई येथे चित्रपट क्षेत्रात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहतात.)
ईमेल id- divresumit@gmail.com
No comments:
Post a Comment