![]() |
जपानच्या अध्यक्षासमवेत बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित करतांना |
विकास विकास म्हणता आज आपल्या देशात बुलेट ट्रेन नीव आखली गेली, खरं तर बुलेट ट्रेन ही खूप फायदा करून देणारी असली तरी त्याने विकासाची गंगा ही काही वाहणार नाही आहे. . कारण या देशात एकी कडे उत्तर प्रदेश सारख्या राज्यात शेकडो बालक ऑक्सिजन च्या असुविधेमुळे मृत्युमुखी पडताय, पूर्ण देशात आज कच्चा तेलाचा भाव 50 रुपये/byarel असताना ही पेट्रोल डिझेल चे भाव हे गगनाला भिडले आहेत. तिकडे आपला विकास दर GDP हा उतरत चालला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय बाजार पेठ जी जगातील मोठी बाजार पेठ म्हणून नावारुपाला येत आहे. ती पण आज कुठेतरी मंदावली आहे. मग एवढे सगळे दिसत असतांना जर आपल्या वाट्याला विकासाच्या नावाखाली जर बुलेट ट्रेन येत असेल तर ती खरंच फायद्याची आहे का हे आपण एकदा सचोटीने पडताळून पहायला हवे.
खरं तर सामान्य माणसाची विकासाची व्याख्या ही खूप सोपी असते, ती म्हणजे पेट्रोल,डिझेल आणि भाजी-पाला ह्या गोष्टी रास्त दरात उपलब्ध होणे अणि शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळणे येवढच आह़े.
तसा माझा काही बुलेट ट्रेन ला विरोध आहे अस नाही अणि बुलेट ट्रेन मुळे रोजगाराची निर्मिती होईल हे ही मला पटतय.
अर्थातच बुलेट ट्रेन मुळे बाकी देशांच्या आपला देशाकडे पहायचा दृष्टीकोन ही बदलेल. या देशात विकासाचे वारे अजून वेगाने वाहू लागतील हे ही तितकाच सत्य आहे आणि आपल्या कर्तबगार पंतप्रधानच्या परराष्ट्रीय धोरणामुळे अणि सर्वाराष्ट्रांशी शांती पूर्वसंबंधांमुळे हा देश सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही हे ही मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो.
विकसनशील देशात असे प्रकल्प उभे राहणे ही विकासाला पुरक असणारी बाजू आहे, पण अशा प्रकल्पांसाठी लागणारी भारतीय शेत जमीनीचे संपादन होणार असेल तर हे असे प्रकल्प ही विकासाला तारक ठरतील की मारक ठरतील हे ही आपण बघायला हवे . आज देशाची ओळख जरी औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्राकडे जात असले तरी ह्या देशाची खरे मुळ हे शेतीच आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. ह्या कृषी प्रधान ओळख असलेल्या देशात भारतीय शेती ही उद्ध्वस्त होणार नाही अणि बळीराजा ही हतबल होणार नाही ह्याची काळजी प्रामुख्याने जर येथील राज्यकर्त्यांनी घेतली तर ह्या "बुलेट सुसाट विकासाला" सर्व सामान्यांचा आणि बळीराजा चा ही पाठींबा असल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान मोदींच्या ह्या बुलेट स्वप्नाला माझ्या शुभेच्छा !!

-प्रसाद भणगे . BE E&TC
No comments:
Post a Comment