नाशिक जिल्ह्यातील नामपुर या छोटयाशा गावातील मुलाने एमपीएससी मध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला.यासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा आयोगामार्फत घेण्यात आली होती.एकूण ३०० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
मुळचे नाशिक जिल्ह्यातील नामपुर येथील विवेक धांडे यांनी ओबीसी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. मैकेनिकल अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेतलेले विवेक यांना लहानपणापासून प्रशासनात येण्याची प्रचंड इच्छा होती. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो त्या भावनेतूण त्यांनी अभियांत्रिकी नंतर पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षापासून त्यासाठी ते मेहनत घेत होते. नुकत्याच झालेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेमध्ये त्यांना थोडक्यात हुलकावनी दिली होती, परंतु त्यांनी त्याची भर आजच्या निकालाने पूर्ण केली.
विशेष बाब म्हणजे 'एमपीएससी'च्या गतवर्षी झालेल्या सर्व पूर्व परीक्षा धांडे यांनी पादांक्रित केल्या. अजून पर्यंत दोन परिक्षांचे निकाल जाहिर झाले आहेत.
धांडे हे एक सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील पंडित वसंत धांडे हे उन्नती माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक आहेत. त्यांचे लहान बंधू अक्षय धांडे हे सुद्धा 'आयसीडब्लूए' च्या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण झाले होते. ते सध्या राजकोट येथील इंडियन ऑइल या महारत्न कंपनीत 'अकाउंट ऑफिसर' या पदावर कार्यरत आहेत. आई स्वाध्यायी विचारांशी बांधिल असल्यामुळे दोन्ही मुलांवर योग्य संस्कार त्यांनी केले. त्यामुळे आज दोन्ही मुलांना शासनामध्ये अधिकारी पदावर जाताना आई पुष्पा धांडे यांना खूप आनंद होत आहे.
आज या एकाच कुटुंबातील दोन्ही भावांमुळे नामपुर या छोट्याशा गावाचे नाव आता प्रकाश झोता मध्ये आले आहे. आजच्या निकालामुळे गांवामध्ये आनंद व्यक्त होताना दिसत आहे.
प्रतिक्रिया:-
" वर्षाची सुरूवात ही मागच्या वर्षी केलेल्या मेहनतीच्या फळाने झाली याचा खूप आनंद होत आहे. मागच्या महिन्यात लागलेल्या विक्रीकर निरीक्षक परिक्षेच्या निकालामध्ये सहा गुणांनी पद हुकले होते, परंतु या निकालाने त्याची भर पूर्ण केली. आता पुढील लक्ष हे येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आहे. " -विवेक धांडे.

![]() |
मित्रांसमवेत आनंद व्यक्त करतांनाचा एक क्षण |
अभिनंदन
ReplyDelete